सगळ्यांना पुस्तक वाचनाला प्रवृत्त करण्यासाठी दिघी येथे संस्थेच्या अभ्यासिकेत ‘वाचन कट्टा’ (आनंद कट्टा ) हा उपक्रम 21 एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आला. अभ्यासिकेतील आणि बाहेरील मिळून 30 ते 40 मुले आणि काही पालक पुस्तके वाचण्यासाठी जमले होते. संस्थेच्या सोशल वर्कर अंजली दळवी यांनी त्यासाठी एक छान पुस्तकाची प्रतिकृती तयार केली होती ( ही संकल्पना पण त्यांचीच आहे. त्यांना संस्थेच्या शिक्षिका मधुरा तागडे, जयश्री व्हटकर, मिलिंद व अनिता बाविस्कर आणि रूपाली माळी यांनी छान साथ दिली) काही पालक पण या उपक्रमाबद्दल चांगले बोलले. मुलांनी आणि त्यांच्या आयांनी आवडीने गोष्टीची पुस्तके वाचायला सुरुवात केली. संस्थेच्या पदाधिकारी प्रतिमा जोशी व अलका उत्पात यांनी पुस्तक कसे वाचावे, कसे हाताळावे याविषयी छान मार्गदर्शन केले. या उपक्रमात आठवड्यातून एकदा काहीतरी गंमत खेळ किंवा एखाद्या पुस्तकाचे अभिवाचन, नाट्यवाचन असेही उपक्रम घेण्यात येणार आहोत.
You May Also Like
Competition Under inclusive education for Specially abled children organised at Pune. In this competition we organize drawing, picture reading, singing songs, Mathematics table, Identifying alphabets and numbers throwing ball in a bucket these kind of simple games were included.
September 2017 40 Deserving girls got the scholarship The scholarship scheme is for needy & eligible girls who want to pursue higher education. While giving scholarship eligible candidates are selected through an interview and proper screening of documents.
